ध्यानमंदीर पाषाण पुणे श्रीसद्गुरू प्राणप्रतिष्टेपुर्वी

‘महालक्ष्मीचे’ अधिष्ठान आणि पंचगंगेच्या अमृत धारांनी समृध्द असलेल्या कोल्हापूर नगरीत दत्त संप्रदायातील गाढे अभ्यासक,उपासक आणि थोर मार्गदर्शक!

परमसत्याची पूर्ण जाणीव तसेच ‘ मी ‘ च सगळीकडे चैतन्य रूपाने आहे असे जाणिवेला जाणीव देण्याचे सामर्थ्य जर कोणत्या तत्वात असेल तर ते ‘गुरुतत्वात ‘आहे. परमसत्य  प्रकाशरूप, ज्ञानमूर्ती , सद्भवाचे घनरूप म्हणजेच सद्गुरू होय. सद्गुरू महात्म्य हे प्रचितीस येणारे आणि ‘ मी-तू ‘ पणाची बोळवण करून टाकणारे असेच असल्याने त्या विषयीचे विचार अक्षरांकित करणे हे उचीत नसताना त्या वर औचित्याचा अध्यास निर्माण करावा लागतो. तरच आत्मविद् अवस्थेत राहावयास लागणारे गुरुतत्व लौकिकात विचार आणि अभ्यास उपयोगी होत असते.

सद्गुरू महात्म्य हा प्रचितीचा भाग आहे. त्यासाठी कठोर साधना, नामस्मरण आणि सातत्य हवे. हे प. पू. गुरुनाथजी  यांचे अनमोल आणि प्रबोधनात्मक  विचार साधकाला निश्चितच प्रेरणाायी आहेत.

जन्म आणि बालपण

प. पू. श्री सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांचे बालपण सातारा जिल्हयातील कृष्णाकाठच्या वाई या निसर्गरम्य परिसरात गेलं.

११ जून १९४० रोजी सुसंस्कृत ब्राह्मण  कुटुंबात कै. कमलाबाई (आई) आणि विश्वनाथ (वडील)  त्यांचा जन्म झाला. घराण्यात अनेक पिढयांपासून दत्तभक्तीची परंपरा होती. मुंगळे घराणे यांचे मूळ गांव भुदरगड तालुक्यातील शेणगाव होते.

श्रीसद्गुरूंचे वडील विश्वनाथ मुंगळे
श्रीसद्गुरूंचे वडील विश्वनाथ मुंगळे
श्रीसद्गुरूंच्या मातोश्री कमलाबाई मुंगळे
श्रीसद्गुरूंच्या मातोश्री कमलाबाई मुंगळे

शिक्षण

सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांचे शालेय शिक्षण वाई येथे . लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी. इंग्रजी आणि संस्कृत या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर याठिकाणी. मराठी, इंग्रजी , संस्कृत साहित्याचा प्रचंड अभ्यास, संग्रह, पाठांतराची आवड. शालेय जीवनापासूनच अध्यात्मिक विचारांकडे आणि अभ्यासाकडे कल.

व्यवसाय

शासकीय तंत्रनिकेतन पुणे आणि कोल्हापूर येथे इंग्रजीच्या अध्यापनाचे कार्य. १९९९ मध्ये निवृत्ती.

उभे डावीकडून - सौ . गौरी , डॉ . केदार कहाते , सौ . गायत्री , चि . अपूर्वा , श्री . अजयराव . बसलेले डावीकडून - कै . भाऊ , वाहिनीआजी , मांडीवर कै. अथर्व , प . पू . सद्गुरू , सौ . शैला मावशी .

परिवार

पत्नी कै. सौ. शैलजा गुरुनाथ मुंगळे.

दोन कन्या कै. सौ. गायत्री अजय देशपांडे (इंजिनिअर) आणि

डॉ. सौ. गौरी मुंगळे – कहाते

गुरुपरंपरा

  1. १९५७ पासून श्री दत्तप्रभूंच्या प्रेरणेने दत्त भक्तीस सुरुवात.
  2. १९६९ मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेस श्री. स्वामी  स्वरूपानंद, पावस यांचा गुरूपदेश.
  3. ६३ वर्षे गुरुचरित्र ग्रंथाचे नित्य पठण , हजारो पारायणे, अध्ययन, विवेचन, लिखाण .
  4. ६० वर्षे सातत्याने दर पौर्णिमेस नरसोबा वाडी येथे सेवाव्रत.
सिदधीविनायक सांस्कृतिक मंडळ कोल्हापूर प्रवचन

व्यक्तिमत्व

व्यायामाची मनापासून आवड, रोज हजार जोरबैठका, वाई ते सातारा सायकलिंग, मुदगर फिरवणे, दांडपट्टा, कुस्ती अशा अनेक गोष्टींची आवड आणि नैपुण्य. गोविंद स्वामी आफळे व शाहिर अमरशेख यांच्या प्रभावामुळे स्वरचित पोवाडे सादरीकरण सुद्धा त्यांनी केले. चित्रपटांची आवड , जुन्या  गीतांचा मोठा संग्रह.

लहानपणापासूनच साहित्यावर अपरंपार प्रेम!! अध्यात्मिक, पौराणिक, तत्वज्ञानावर आधारित संस्कृत, इंग्रजी, मराठी ग्रंथांचा प्रचंड व्यासंग आणि संग्रह.

ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, नामदेव गाथा मुखोद् गत , अर्थासह उत्तम विवेचन. क्रांतिकारकांची अनेक चरित्रांचे वाचन , लेखन, संग्रह त्यावरील अभ्यास , लेखन , विवेचन. शाहीर अमरशेख, गोविंद स्वामी आफळे यांचा प्रभाव.

ध्यानयोग, संत साहित्याचे गाढे अभ्यासक . गुरुतत्व हे बुद्धीगम्य नाही ते सर्वव्यापी आहे. भाषा कोणतीही असो तरी ती संस्कारित आणि चिंतनशील विचारसरणीतून तिचा वापर केल्यास ती हृदयाचा ठाव घेते. त्यामुळे स्वयंअध्ययन, वाचन , मनन, चिंतन यावर त्यांचा भर असे.

१. कोल्हापूर येथे झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष.
२. दिल्ली येथे जागतिक शांतता परिषदेस निमंत्रित.

जीवनकार्य

संतचरित्रे , तत्वज्ञान या विषयांवर भारतात अनेक ठिकाणी व्याख्यानमाला. पारंपरिक सांस्कृतिक वाङ्‍‍मय, साधनमार्गातील साधक – बाधक विचार , औपनिषदिक तत्वज्ञान, सिद्धांची चरित्रे, भारतीय तत्वज्ञानाला आधारभूत असलेला गीताबोध आणि तौलनिक अभ्यास त्यांनी करून अनेकांना मार्गदर्शन केले. अनेक लोकांना प्रबंध लिखाणास मार्गदर्शन.

इंग्रजी, संस्कृत साहित्यातील जुन्या, नव्या प्रवाहांकडे पुन्हा पाहणे, अभ्यास , विवेचन .

अक्षरांचा सहवास जीवन संतुलित, समृध्द करतो. स्वरुपावस्था अनुभवावी लागते . यासाठी ध्यान योगाचे अनुसंधान आवश्यक आहे. आपले संपूर्ण जीवन या धेयासाठी त्यांनी व्यतीत केले

निर्देश

गुरुकृपेेची आवश्यकता जीव – शिवाच्या स्नेह बंधनासाठी आणि बंधनातून बंधनातीत होण्यासाठी आहे. गुरुकृपा याचाच अर्थ असा आहे की, ज्यातून मनुष्य कृतकाज होतो. सकल तृप्ती अनुभवतो. ज्यामुळे जीव, जगत आणि ईश्वर यांचे सम्यक ज्ञान होते. गुरुकृपा आत्मप्रत्यय देते आणि आत्मप्रत्ययाचे अधिष्ठान आत्मज्ञान हेच असते. सद्गुरु महात्म्य हे वर्णनातीत आहे. हीच त्यांची शिकवण होती.

लेखन

संत चरित्रे, तत्वज्ञान यावर अनेक नियतकालकांमधून, वृत्तपत्रातून लेखमाला.

ग्रंथ संपदा
चैतन्यधारा , साधकाचा प्रवास, अक्षरब्रम्ह, ध्यानयोग, हिरण्यपथ, प्रचिती,जे जे स्फुरले ते सहज, समर्थ म्हणतात, ध्यानयोग

ओवीबद्ध रचना
श्री कृष्णचरित्र , नामसुधा, भक्त तारक स्वामीपाठ, भक्त तारक गुरुचरित्र

अध्यात्मिक अनुभूती आणि प्रवास
ईश्वरेच्छा

पुरस्कार

१. ३०/०९/२००१ रोजी पुणे महानरपालिकेच्या वतीने श्री करवीरपीठ शंकराचार्य यांच्या हस्ते मानपत्र.

२. श्री करवीर निवासिनी पुरोहित मंडळातर्फे सांस्कृतिक पुरस्कार.

३. डॉ. रा.ना.पाठक स्मृती पुरस्कार

४. आळंदी देवाची तर्फे गौरव.

५. श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळ आणि अखिल भारतीय कीर्तनकुल कोल्हापूर सन्मानपत्र.

६. १७/०२/२००३ कोल्हापूर महानगपालिकेच्या वतीने करवीर भूषण पुरस्कार.

७. २४/०४/२००६ वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट मानपत्र.

८. स्वातंत्र्य सेनानी एल. वाय. पाटील ट्रस्ट मानपत्र.

९. श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे मानपत्र २७/०८/२००६

१०. श्रीमंत नाना साहेब पेशवा धार्मिक आणि अध्यात्मिक पुरस्कार १३/०२/२०१३

११. ऋग्वेद भूषण पुरस्कार २०१७

१२. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी लाईफ टाईम achievement पुरस्कार.

१३. डॉक्टरेट इन spiritual literature award २०१८ .

निर्वाण

दिनांक ६ ऑगस्ट २०२० रोजी  अध्यात्मिक ,  अलौकिक प. पू. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे हे अनंतात विलीन झाले.