Home2024-02-10T15:56:53+05:30

प. पू. श्री सदगुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे

११ जून १९४० – ६ ऑगस्ट २०२०

सातारा जिल्ह्यातील वाई येथे जन्मलेल्या डॉ. गुरुनाथ मुंगळे यांनी इंग्रजी व संस्कृत विषयात एम.ए. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन पुणे व कोल्हापूर येथे इंग्रजीच्या अध्यापनाचे कार्य केले. १९५७ पासून त्यांनी श्री दत्त भक्तीस सुरुवात केली होती. त्यांनी संत वाड:मय व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. संतचरित्रे व तत्त्वज्ञान या विषयावर त्यांनी विविध ठिकाणी व्याख्याने व प्रवचन देण्यास सुरुवात केली. संत साहित्यावर विपुल लेखन केले. त्यांना दिल्ली येथील जागतिक शांतता परिषदेला आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. मुंगळे हे कोल्हापूर येथे भरलेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

जन्म आणि बालपण

प. पू. श्री सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांचे बालपण सातारा जिल्हयातील कृष्णाकाठच्या वाई या निसर्गरम्य परिसरात गेलं. ११ जून १९४० रोजी सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबात कै. कमलाबाई (आई) आणि विश्वनाथ (वडील) त्यांचा जन्म झाला.

शिक्षण

सदगुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांचे शालेय शिक्षण वाई येथे. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी. इंग्रजी आणि संस्कृत या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर याठिकाणी. मराठी, इंग्रजी,संस्कृत साहित्याचा प्रचंड अभ्यास, संग्रह, पाठांतराची आवड.

छायाचित्र संग्रह

gayatri-atharv

कै.सौ. गायत्री अजय देशपांडे व चि.अथर्व

Title

Go to Top