ईश्वरेच्छा

Home/Books/ईश्वरेच्छा

ईश्वरेच्छा

500.00

In stock

(1 customer review)

साधक ते श्रीसद्गुरूपर्यंतची जीवनगाथा – “ईश्वरेच्छा”
अध्यात्मिक पातळीवर आत्मिक अनुभूती आणि निरंतर आनंद प्राप्तीचा ध्यास घेतलेले, आत्मरंगी सदैव रंगलेले, संपर्कात येत असलेल्या प्रत्येकांना अत्यंत प्रेमळपणाने जीवनातील आंतरिक परिवर्तनासाठी रोकडी प्रचिती देऊ करणारे संतसाहित्याचे अभ्यासक प. पू. श्रीसद्गुरू डॉ. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांच्या जीवनप्रवासात त्यांनी अनुभूती प्राप्त करताना घेतलेल्या प्रयासाचा प्रत्येक क्षण विलक्षण करणारा ग्रंथ अर्थात “ईश्वरेच्छा”

In stock

SKU: ईश्वरेच्छा Category:

Description

Additional information

Weight 1200 g

1 review for ईश्वरेच्छा

  1. अथर्व ज्ञानपीठ

    सद्गुरू डॉ.गुरुनाथ मुंगळे यांच्या अध्यात्मिक प्रवासावर आधारित ईश्वरेच्छा या पुस्तकाच्या प्रकाशासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.

    या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची माझी मनापासून इच्छा होती, पण काही कारणास्तव मी उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

    डॉ. मुंगळे गुरुजी यांचा आणि माझा खूप वर्ष स्नेह होता. कोल्हापुरातील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक मध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते काम करत असताना त्यांची आणि माझी ओळख झाली.
    ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले.
    नंतरच्या काळामध्ये गुरुजींनी अध्यात्माचा वसा घेतला आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला. मैत्रीचं नातं हे शिष्य आणि अध्यात्मिक गुरु पर्यंत बदलत गेलं. प्रत्येक गोष्टीमध्ये सदैव सकारात्मक असणारे गुरुजी हे प्रचंड ऊर्जेचे स्त्रोत होते .
    त्यांनी आपल्या ज्ञानाने अनेकांचे जीवन उजळून टाकले.इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे पाठांतर प्रचंड होते.एखाद्या विषयावर बोलताना ते या दोन्ही भाषांमधील उदाहरणे द्यायचे .

    मी ज्या ज्या वेळी मी त्यांना फोन करत होतो त्या त्यावेळी ते माझा फोन स्वीकारत होते आणि सदैव माझ्या भेटीसाठी उपलब्ध असायचे . मी त्यांच्या भेटीसाठी खूप वेळा त्यांच्या घरी जात असे.

    घरी गेल्यानंतर त्यांच्या आईची भेट व्हायची. माझ्या आई लहानपणी देवाघरी गेल्याने गुरुजींच्या आईना मी आईप्रमाणे मानायचो. त्यांच्या सौभाग्यवती अगदी आपुलकीने आमच्यासाठी कॉफी करून द्यायच्या. ही कॉफी मला खूप आवडत असे .

    त्यांच्या कुटुंबाशी आमचे कौटुंबिक नाते आहे..
    आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुजींच्या सहवासात असावं ,असे मला नेहमी वाटायचे. आणि तो सहवास मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो.

    आज जरी गुरुजी आपल्यामध्ये नसतील तरी त्यांची छत्रछाया आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर नेहमीच राहणार आहेत. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो .  धन्यवाद 

    Dr. D. Y. Patil
    On the occasion of Publication of Ishwarechha book

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Title

Go to Top