श्री सदगुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांच्या नावे दिला जाणारा शिवाजी विद्यापीठ येथील पुरस्कार श्री समीर चव्हाण आय आय टी कानपुर यांना मिळाला
समीर चव्हाण यांनी द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला आहे….संत तुकाराम यांचे कार्य केंद्रस्थानी ठेवून वैदिक, बौद्ध,भागवत, नाथ, सूफी अशा परंपरांचे अवलोकन आणि त्या अनुषंगाने मराठी, हिंदी , उर्दू,पंजाबी यां भाषांमधल्या तीनशे रचनांवर विस्तृत चर्चा केली आहे….तसेच त्यातील अर्थ सौंदर्य, विषय सौंदर्य यामध्ये तुकोबांनी कोणती भाषिक साधने योजली,परंपरेच्या पाऊलखुणा,स्वानुभूती, ममत्व,अभंगातील सूफी तत्वे,विद्रोही पैलू,पारंपरिक भक्ती,अस्तिकता -नास्तिकता, मृत्यूच्या स्वरूपातील कुतूहल,साधक, स्थितप्रज्ञ अवस्था अशा अनेक अंगाने चर्चा आहे….वाचनीय आहे…. सदानंद मोरे, हे तर मास्टरच आहेत…… बौद्धिक, आध्यात्मिक ,भावनिक असा परिपूर्ण कार्यक्रम अर्थात आई बाबांचा आशीर्वाद आणि अधिष्ठान