डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
तुझ्या जीवनाची आर्त विराणी सांगू नको कहाणी
मागील आठवणीने जीव होतो घालमेल
मुलाबाळांच्या आठवणींनी जीवाची होते उलघाल ।।१।।

जुन्या भेटी गाठी जुने ते वैभव आठवतात
नको नको म्हणता आठवणी त्या सतावतात
फिरून मन जाते मागीलच्याा काळांत
किती विसरू किती सावरू मन घोटाळते काळात ।।२।।

सुखदुःखाचे काटे आयुष्यभर टोचले
विस्कटलेले मन अजून ना सावरले
कधी सुख, कधी दुःख शरीराने झेलले
नाही नाही म्हणता गत आठवणीने डोळे पाणावले ।।३।।

आयुष्य संपताना संपलीच ती कहाणी…
डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी

( सौ. शैलजा गुरुनाथ मुंगळे, कोल्हापूर )