जेथे भक्तिचा अथांग सागर
तेथे भक्तांचा अलोट पूर
नरसोबाची वाडी नाही रे दूर
पहाटेच्या वेळी कृष्णातीरावरी
भूपाळी-काकंडयाची सूर ।।१।।

दत्त दत्त मुखी नाम आठवा दिगंबरा कर धावा
सगुण निर्गुण रूप माउली आता दाखवा
चौऱ्याऐंशीचा फेरा नको
माउली मोक्ष आता दाखवा ।।२।।

औदुंबराचे अतिरम्य स्थान तेथे आपले अधिष्ठान
सगुण निर्गुण आपले दर्शन होता
भक्तीचा सागर होण्यास
भक्ती शिकवली आपण ।।३।।

अखिल ब्रम्हांडाचे तेज आपुल्यात साठले
पालखीतले रूप अतिभव्य तेजाळले
आपल्या देहावरती सुवर्ण कांतीचे तेज
मस्तकावरी जळाळे हिरे पाचूंचा शिरपेच ।।४।।

पालखी निघता ढाळतील मोरपिसे सुवर्णकांती,
भगवी वस्त्रे, हाती कमंडलू पायी खडावा
गळा रुद्राक्ष माळा कपाळी भस्म,
केशरी गंधाचा टिळा ।।५।।

अखिल ब्रम्हांडनायकांच्या स्तुतीचे एकच गाणे
फिरूनी नको पुन्हा जन्म – मरण हेच मागणे
भक्तिसागरात नामाच्या नावाने
रंगून मोक्ष घेणे ।।६।।

( सौ. शैलजा गुरुनाथ मुंगळे, कोल्हापूर )