ईश्वर इच्छा
अध्यात्मिक उन्नतीच्या रस्त्यावरील मैलाचा दगड
लेखक
सद्गुरू गुरूनाथ विश्वनाथ मुंगळे

मुंगळे

भाग १
जे कृष्णमूर्तींच्या विचारधारेमध्ये त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे जे त्यांचे मित्र अल्दौस हक्सले यांनी अधोरेखित केले आहे.
त्याप्रमाणे विज्ञानाचा विस्तार होत असताना विज्ञान समाजात कसे अभिसरते याबद्दल ते म्हणतात की एखादा वैज्ञानिक शोध लागल्यानंतर त्याचा वापर आणि उपयोग त्यासंबंधीच्या ज्ञानासह सर्वांना सहभागी होता येईल अशा पद्धतीने पसरत जातो. म्हणजे एखादे वैज्ञानिक तत्व शोधून काढले तर त्याचे उपयोजन सर्व मानव जातीला एकसमान पद्धतीने कोणालाही वापरता येते.
कृष्णमूर्ती म्हणतात धर्माच्या बाबतीत मात्र जगात मतमतांतरे होतात आणि ज्यांना तो खऱ्या अर्थाने समजला आहे आणि अनेक आध्यात्मिक कदाचित रहस्य पूर्ण अशा अनेक गोष्टी समजून इतरांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच अशा व्यक्ती मग ते संत असतील किंवा ईश्वर स्वरूप अवतार मानले जात असतील हे काळाच्या उदरात नाहीसे होतात
ज्यावेळी अशी संधी मिळेल की धर्म ज्यांना खऱ्या अर्थाने समज ला आणि ईश्वर तत्त्वाविषयक निश्चित आणि ठामपणे सर्वांना जाणता येईल आणि अनुभव घेण्याच्या दृष्टीने पुढे जाता येईल असे हे सिद्ध साधू संत किंवा अवतार जगासाठी आपले संचित मागे ठेवतील तेव्हाच आपण तथाकथित बुद्धी श्रद्धा आणि ज्ञानाच्या म्हणजेच ज्ञातापासून ज्ञाताच्या
गुलामगिरीतून मुक्त होऊ
ईश्वर इच्छा हा ग्रंथ वाचत असताना सातत्याने प्रत्येक क्षण जगत असताना मुंगळे सरांनी ईश्वरीचे वेध घेत बोध घेत आणि अनुभव घेत केलेल्या अध्यात्मिक वाटचालीचा इतका प्रांजल प्रामाणिक व सौंदर्यपूर्ण आलेख मांडला आहे की कृष्णमूर्तींच्या सांगण्याप्रमाणे खरोखरच अध्यात्मिकतेचे रहस्य आणि गोड स्वरूप स्पष्ट आणि मधुर तसेच प्रेममय आणि समाधानकारक रित्या इतरांसाठी खुले झाले आहे.
एक भाषा विषयाचा अध्यापक ,आपल्या भाषिक कौशल्याने आणि श्रद्धायुक्त मनाने ,संस्कारयुक्त आणि परंपरेशी बद्ध अशा दत्तभक्तीने अत्यंत मनापासून ईश्वर विषयक विविध साधना ,करतो तसेच अभ्यासपूर्ण पंथ आणि विचार यांचा अभ्यासही करतो. स्वतः अनुभवतो आणि येणाऱ्या प्रत्येकास त्या अनुभवाच्या आधारावर तसेच आपल्या साधनेतून, सिद्ध अंतर्ज्ञानी वाणीने ,आह्यिक तसेच आध्यात्मिक
मार्गदर्शन करतो,हेच मोठे आश्चर्य आहे.
अशा या त्याच्या जगावेगळ्या जगण्याच्या आणि विविध प्रकारे आजूबाजूला आणि स्वतःच्या कुटुंबात झालेल्या काळाच्या आघाताचा, मृत्यूचा मरणाचा अर्थ ईश्वर इच्छेच्या दर्पणातून अनुभवतो. हे कदाचित पुढच्या पिढीला पटणार नाही.
अनेक सार्वकालीन धार्मिक आणि अध्यात्मिक संदर्भ आणि त्यांचा समकालीन अर्थ आजच्या भारतामध्ये कुणी खूप सहजपणे परंतु भरगच्च पुराव्यासह ईश्वरी तत्त्वाला शरण जाऊन मांडत आहे ही फार मोठी ऐतिहासिक आणि अत्यावश्यक आणि जणू दैवयोजित घटनाच आहे असे वारंवार प्रतीत होत राहते.
राहतात.
डॉ राजेंद्र पारिजात